सोलापूर : प्रतिनिधी
श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी महत्त्वाच्या सण उत्सव व महत्त्वाच्या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 06.00 ते रात्री 12.00 या वेळेत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत देण्यात आली आहे. या वर्षातील विविध सण उत्सवाच्या एकूण 15 दिवसांना ही सवलत जाहीर करण्यात आली असून, याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार मकर संक्रात, श्री सिद्धरामेश्वर यात्रा, सोलापूर (दि. 15 जानेवारी), शिवजयंती (दि.19 फेब्रुवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/सांगता मिरवणुकीचा दिवस, गणेश चतुर्थी (दि.7 सप्टेंबर), गणपती उत्सव नववा दिवस (दि. 15 सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (दि. 17 सप्टेंबर), ईद-ए-मिलाद (दि. 16 सप्टेंबर) किंवा चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे-पुढे, नवरात्र अष्टमी (दि 10 ऑक्टोंबर) नवरात्र नवमी (दि 11 ऑक्टोंबर), दीपावली लक्ष्मीपूजन (दि.01 नोव्हेंबर), ख्रिसमस (दि. 25 डिसेंबर) या सणाच्या व उत्सवाच्या दिवशी सवलत जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरित चार दिवस हे महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी व आवश्यकतेनुसार सवलत जाहीर करण्यात येईल.