ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय अर्थव्यवस्था जगात 5 अर्थव्यवस्थांत समाविष्ट ; पंतप्रधान मोदी !

नाशिक : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. या भरगच्च कार्यक्रमानंतर मोदी आता अटल सेतूचे लोकार्पण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.

तरुणांची ताकद व सामर्थ्यामुळे भारत जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये पोहोल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केला. भारताला एका नव्या उंचीवर नेण्याचे महत्त्वाचे काम तरुणांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या ताकदीमुळेच आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांत समाविष्ट झाला आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात तरुणांना सक्रिय राजकारणात येऊन देशाच्या विकासाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी तरुणांना संबोधित करताना म्हणाले की, आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. गुलामगिरीच्या काळात भारताला नवी ऊर्जा प्रदान करणाऱ्या थोर महापुरुषाला हा दिवस समर्पित आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा.

देशाच्या तरुणाईच्या खांद्यावर भारताला एका नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. तरुणांच्या शक्तीमुळेच भारत आज जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे. सरकारने मागील 10 वर्षांत तरुणांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या. या संधीच्या जोरांवर तरुणांनी देशाला पुढे घेऊन जावे. ते हे पूर्ण ताकदीने करतील असा मला ठाम विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!