बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्याआत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता दोन हजार विद्यार्थी बीडमध्ये एकवटले होते. शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. नगररोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.
यामोर्चासाठी केवळ दोनशे विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची पोलिसांनी परवानगी दिली असताना प्रत्यक्षात मोर्चाततब्बल दोन हजार विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर येण्याच्या मागणी लावून धरली. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कट्ट्यावर झाडेतोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाच नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी नगर रोडवर अर्धा तास ठिय्या केल्याने वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी मोर्चेकरीविद्यार्थ्यांना रस्त्यावरून उठण्याचे सांगूनही विद्यार्थी नउठल्याने शेवटी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गुन्हानोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात चार आयाेजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात विद्यार्थ्यांसह १०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तलाठी भरती रद्द झालीच पाहिजे, परीक्षा फीस परतमिळालीच पाहिजे, प्रत्येक वर्षी पोलिस भरती झालीचपाहिजे, टीसीएसकडून परीक्षा घेणे बंद करा,एमपीएससीमार्फत परीक्षा घ्याव्यात अशा घोषणाविद्यार्थ्यांनी दिल्या. या मोर्चात विद्यार्थी नेते धनंजय गुंदेकर, राहुल कवठेकर, राहुल कांबळे आदींचा सहभाग होता. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले.