रखडलेल्या देगाव एक्सप्रेससह अक्कलकोट शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी देऊ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये ग्वाही
अक्कलकोट , दि.१९, (प्रतिनिधी) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम लल्लाचे स्वप्न पूर्ण करत आहेत तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत असे सांगून अक्कलकोट मतदार संघाच्या विकासासाठी रखडलेल्या देगाव एक्सप्रेस योजनेसाठी ३०० कोटी तर अक्कलकोट शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ७५ कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.ते अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. व्यासपीठावर यावेळी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाष देशमुख, आ.राजेंद्र राऊत, आ.रणजीतसिह मोहिते पाटील, आ.राम सातपुते, आ. समाधान आवताडे,गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे, माजी खा.अमर साबळे, रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, शहाजी पवार, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, चंद्रकांत इंगळे, आनंद तानवडे, शिवशरण जोजन,शिवानंद पाटील, संजीव पाटील, रामप्पा चिवडशेट्टी,नरेंद्र काळे, संजय देशमुख, चेतनसिंह केदार, सुनील बंडगर, ननू कोरबू, अविनाश मडीखांबे, मनीष देशमुख, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमची प्रेम हीच आमची संपत्ती, आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून विकास कामाचे पर्व सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन मंदिरसह एसटी स्टँड विकास काम होत आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी श्री मल्लिकार्जुन दर्शन घ्यावे असे एक सुंदर श्रद्धेय मंदिर बनत आहे. या पुढील काळात. एक आधुनिक बसस्थानक तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे होत आहे. महिलांना एसटी चा प्रवास मध्ये सूट दिली. आता बससेवा उच्चं दर्जाचे देऊ. अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, मी कारसेवकाचा मुलगा म्हणून मला गर्व आहे. तालुक्यातील जनतेचा प्रेम पाहण्यासाठी कै. पंचप्पा कल्याणशेट्टी हे हयात नाहीत असे म्हणत असताना, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना अश्रूअनावर झाला. राजकारणात शब्द पाळणारा नेता फडणवीस साहेब तुम्ही आहात. सन २०१४ मध्ये २०१९ मध्ये तुम्ही मला विधानसभा निवडणूक लढायचं आहे. म्हणून सांगितलं आणि तो शब्द तुम्ही पाळला. सत्तेत असो, नसो भरभरून निधी दिला. निधीचा पाऊस तालुक्यात तुमच्यामुळे झाला. सत्ता असो नसो, तुमच्या पाठीशी अक्कलकोट जनता सतत राहील. राज्यात सत्ता नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीकडून आपण भरभरून निधी दिला. निधीची यादी न संपणारा आहे. कोव्हिडं सारख्या परिस्थितीत आपण राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरला. अक्कलकोट मध्ये तुमच्या मार्गदर्शनाने मी ऑक्सिजन सुविधा बेडचे मोफत उपलब्ध करून दिलं दिलं. एकरुख सिंचन निधी तुमच्या मुळे मिळाली. आता देगाव एक्सप्रेस करण्यासाठी ३०० कोटी रुपये द्या, असे विविध मागण्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मागणी केली.अक्कलकोट ते जेऊर, करजगी तडवळ मार्गे कर्नाटक जोडणारा आहे.वितरण व्यवस्था अपुरी मुळे पाणी असूनही व्यवस्थित पाणी मिळत नाही.देगाव जोडकालवा एक्स्प्रेस योजना साठी निधीची आवश्यक आहे.लोकसभेसाठी काँग्रेस गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. तालुक्यात फिरत असताना माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. सुरुवात तुम्ही करता, शेवट आम्ही करू. मतपेटी फुटेल तेव्हा कळेल,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी उपसभापती विलास गव्हाणे, माजी सभापती विमल गव्हाणे,माजी सभापती महेश जानकर, माजी सभापती जयश्री जानकर, शिक्षण सम्राट दत्तात्रय सुरवसे,यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर व एसटी स्टँड पायाभरणी शुभारंभ यासह विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोटकराकडून नामदार फडणवीस यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.जय श्रीरामचे घोषणानी दुमदुमून गेले. बंजार समाजातील शेकडो महिलांनी फडणवीस यांच सन्मान केला.