---Advertisement---

महामार्गावर भीषण अपघात : 12 जणांचा मृत्यू बस चालक जखमी !

By team
On: October 20, 2024 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच राजस्थान येथील धौलपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-11B वर एका वेगवान बसने टेम्पोला धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर बस चालक जखमी झाला. त्यांना धौलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण लग्न समारंभ आटोपून परतत होते. मृतांमध्ये आठ मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह बारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बारी उपविभागात हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारी शहरातील करीम गुमट येथील रहिवासी असलेले सुमारे 15 जण सर्मथुरा भागातील बरौली येथे लग्न समारंभासाठी गेले होते. त्यापैकी बहुतेक मुले होती. रात्री उशिरा सर्वजण टेम्पोने बारीकडे परतत होते. रात्री अकराच्या सुमारास धौलपूरहून जयपूरकडे जाणाऱ्या भरधाव बसने राष्ट्रीय महामार्ग-11 ब वरील सुन्नीपूर गावाजवळ टेम्पोला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी महामार्गावरून जाणारी इतर वाहने घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी टेम्पोमध्ये बसलेल्या लोकांना बारी हॉस्पिटलमध्ये नेले. या अपघातात बसचेही नुकसान झाले असून, ती पोलिसांनी जप्त केली आहे.

बारी हॉस्पिटलचे पीएमओ डॉ हरिकिशन मंगल यांनी सांगितले की, ही घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. रात्री 12 वाजता जखमींना बारी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय पथकाने सर्वांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला. 14 लोकांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला. चार जखमींना गंभीर अवस्थेत ढोलपूरला रेफर करण्यात आले, मात्र दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. २ जखमींवर धौलपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!