मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसल्याने राज्य सरकार खळबळून कामाला लागला आहे तर यावर मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे. कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. मागासवर्गीय आयोग काम करत आहे. आवश्यक माहिती (डेटा) गोळा करण्यात येत आहे. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत, शब्द दिला आहे.
सरकार सकारात्मक असताना आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या जरांगे यांनी आंदोलन करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देणार आहे. सरकार नक्की आरक्षण देईल. यासाठी आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य काही नेते काम करत आहेत. जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅरंटी देणारे आहेत. त्यांनी अर्थव्यवस्था भक्कम केली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.