ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ; भाजपचे अमरिश पटेल विजयी

धुळे: पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजनी आज होत आहे.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या अमरीश पटेल यांचा विजय.  त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. भाजपच्या अमरीश पटेल यांना 332, तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत, त्यामुळे अमरीश पटेल यांचा विजय झाला असून, त्यांची अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.

 

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झालं होतं. आज (3 डिसेंबर )मतमोजणी झाली असता भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरिश पटेल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील या दोघांमधून कोण बाजी मारणार, याची उत्कंठा ताणली गेली होती

 

अमरिश पटेल विरोधकांची 133 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!