ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आज होणार रोहित पवारांची ईडीकडून चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अँग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सागितले आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे मंगळवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी वैद्यकीय कारण देत ईडीकडे आणखी वेळ मागितल्याची माहिती मिळते. मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचे कथित उल्लंघन करत जोगेश्वरी येथे एका आलिशान हॉटेलचे बांधकाम करून मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बैंक्वेटच्या नावाने आमदार वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी इंडीने वायकरांना २३ जानेवारीला चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.दरम्यान, आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याचे समजते. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी इंडी कार्यालयाबाहेर गोळा होण्याच्या शक्यतेतून येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!