ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आंतरिम अर्थसंकल्प हा आत्मविश्वासाने सादर केलेला -सीए.उटगे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आगामी काळात येणार्‍या लोकसभेचे निवडणूक पाहता आघाडी सरकारने जसे २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळेस आंतरीम अर्थसंकल्पामध्ये मा अर्थमंत्र्यांनी पीएम किसान योजना, आयकरामध्ये भरघोस सूट, पायाभूत सुविधातील घोषणा ई. आकर्षक तरतुदी सादर केले होते, या वर्षी तसे आकर्षक घोषणा न करता मागील १० वर्षातील विकसीत अर्थव्यवस्थेचे तुलनात्मक आकडेवारी सादर करण्याचा प्रयत्न केले आहे. यावरून असे निदर्शनास येते की आघाडी सरकर हे येणार्‍या आगामी निवडणुकीच्या निकलाबद्दल सकारात्मक आहे. आयकरामध्ये सामान्य करदात्याला अपेक्षित असे वाढीव सूट मिळाले नाही. वस्तु व सेवा कर (GST) मध्ये लहान व्यापरांसाठी काही तरतुदी अपेक्षीत होते ते सुद्धा मिळालेले नाहीत. शेतकर्‍यांसाठी कांदा निर्यात प्रश्न असेल, तेलबिया चे किमान आधारभूत किमत (MSP), खताचे प्रश्न असतील या बद्दल अर्थसंकल्पामध्ये कोठेही स्पर्श केलेले नाही. सदरचा अर्थसंकल्प हा आंतरिम असल्याने निवडणुकीनंतर आपल्याला अंतिम अर्थसंकल्पामध्ये अजून काही लोकप्रिय अशा तरतुदीबद्दल इच्छा बाळगूया. एकंदरीत सदरचा अर्थसंकल्प पाहता हा निवडणुकीच्या तोंडावर आकर्षक लोकप्रिय तरतुदीचे घोषणा न करता वास्तववादी आणि भारताला विकिसीत अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा असा हा अर्थसंकल्प होता.
– सीए ओंकारेश्वर उटगे , चार्टर्ड अकाऊंटंट अक्कलकोट ९४-०३३-९७-०११

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!