कल्याण : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून भाजप आमदाराने शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती, आता या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण येथील द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीच्या मालकाने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या दीड तासांतच हिललाइन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याकडून गोळीबाराची घटना घडली.
३१ जानेवारीला जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांना गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार मधुमती ऊर्फ नीता जाधव यांनी २ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता केली. त्यानुसार आ. गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला