ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रजनीकांतची राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात रजनीकांत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा करत पक्षाच्या घोषणेची तारीखही जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!