ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बापरे : १११ दुचाकी चोरल्या अन पोलिसांनी अशी केली अटक

नागपूर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून विरोधक सरकारवर गुन्हेगारीचा आरोप करीत असतांना नुकतेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात एक मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.विदर्भातील नऊ जिल्ह्यातून एका सराईत दुचाकी चोराला अटक करीत तब्बल १११ दुचाकी ताब्यात घेतल्या आहे.24 वर्षांच्या अट्टल दुचाकी चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवीन विक्रमच रचला आहे. याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये एका चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवा विक्रम रचला आहे. ललित भोगे असं चोरट्यांच नाव असून तो कोंढाळीचा रहिवासी आहे. हा गुन्हेगार फक्त 24 वर्षांचा ललितवर इतर कुठलेही गुन्हे दाखल नाही. मात्र बाईक चोरीमध्ये मोठे गुन्हेगार त्याच्यासमोर फेल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या ललित भोगेने ललितने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये गाड्यांची चोरी केली. सर्वप्रथम तो गाड्या हेरायचा. सोसायटींची पार्किंग लॉट, बँकेबाहेरील गाड्या यावर तो पाळत ठेवायचा आणि गाड्या लंपास करायचा. या चोरी केलेल्या दुचाकी तो ग्रामीण भागात विकत होता. विकत घेणाऱ्यांना तो कागदपत्रे दोन महिन्यात देतो म्हणून सांगायचा. मात्र त्याने कधीच कोणाला कागदपत्रे दिली नाहीत. या चोराने तब्बल 77 लाख रुपये या चोरीच्या दुचाकी विकून मिळवले आहेत. दरम्यान, आरोपीने आणखी कुठे कुठे या चोरीच्या गाड्या विकल्या आहेत, नेमका त्याचा आकडा किती आहे, याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!