सोलापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सदबुद्धी येवु दे, या मागणीसाठी आज बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायकाळी 7 वाजल्यापासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर रात्रभर “आत्मक्लेश जागर आंदोलन” करणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
विजय रणदिवे म्हणाले कि, केंद्र सरकारने देशातील शेत्कर्यांवर तीन कृषी कायदे लादलेआहेत. हे कायदे शेत्कर्यांवर अन्याय करणारी कायदे आहेत. हे कायदे शेतकर्यांना उद्वस्त करणार आहेत.
मागील ७ दिवासांपसुन दिल्लीच्या वेशीवर पंजाब आणि हरीयाणामधील शेतकरी ठाण मांडुन आहेत. त्याना पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर हे जागर आंदोलन आयोजीत केली आहे. रात्री आठ वाजता पिट्ला-भाकर खावुन आंदोलनाला सुरुवात होणार असल्यची माहीती विजय रणदिवे यांनी दिली.