ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई : वृत्तसंस्था

देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात प्रवेश करून घेण्यासाठी पक्षाचे नेते यशस्वी ठरत असतांना आता काँग्रेसनंतर भाजप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपकडून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल, अशी भाजपची भूमिका आहे. यासाठीच भाजप प्रयत्नशील आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. इतकंच नाही, तर मंत्रिमंडळात या नेत्याला महत्त्वाचे खाते देखील मिळणार, अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत इन्कार केला. आता बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

आता शरद पवार गटाचा हा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!