ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयंत पाटलांना होती उपमुख्यमंत्री पदाची ऑफर ; राज्यात मोठी खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात अनेक पक्षाला मोठे धक्के बसत असतांना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील भाजपात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता त्यांच्या जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू समर्थक पी.आर. पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पी.आर.पाटील म्हणाले कि, साधारण दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करत समर्थक आमदारांसह भारतीय जनता पक्ष सोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेले देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर जयंत पाटील यांना दिली होती. जयंत पाटील यांनी देखील या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेत ही ऑफर स्वीकारावी का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला होता. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ न सोडण्याचा सल्ला, जयंत पाटील यांना दिला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर न स्वीकारत शरद पवार यांच्यासोबत कायम राहणे पसंत केले होते. त्यामुळे आता जयंत पाटील शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार नसल्याचा दावा, पी. आर. पाटील यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!