बुलढाणा : वृत्तसंस्था
शिवजयंतीनिमित्त एका स्थानिक वाहिनीला मुलाखत देताना १९८७ मध्ये वाघाची शिकार केल्याचे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते त्याची वनविभागाने गंभीर दखल घेत गायकवाड यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरात शिवजयंती साजरी करण्यात येत असताना आमदार संजय गायकवाड यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला आपल्या गळ्यात वाघाचा दात असल्याचे सांगितले होते तसेच हा दात आपण वाघाची शिकार करून मिळवल्याचेही त्यांनी सांगितले होते दरम्यान, त्यांची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली होती वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कायद्यान्वये कोणत्याही वन्यप्राण्याच्या शरीराचा अवयव जवळ बाळगणे गुन्हा आहे. आमदार गायकवाड यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याची दखल घेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर वनगुन्हा दाखल केला आहे वाघाचा दात तपासासाठी पाठविला आहे.