ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मी जेलमध्येही आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही. अटक करून जेलमध्ये टाकले, तरी मी मागे हटणार नाही. मी जेलमध्येही आमरण उपोषण सुरू करील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मी सत्ताधारी नेत्यांना बोललो. राग मात्र, मराठा नेत्यांना आला. आपल्या नेत्यांना जात हवी की नेता हवा, हे स्पष्ट व्हावे. मराठा समाजाला सांगतो, ओबीसीतून आरक्षणाची आपली मागणी आहे, ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. तूर्तास आंदोलन स्थगित परीक्षांचा कालावधी असल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करून धरणे आंदोलन करणार असल्याचे जरांगे- पाटील यांनी स्पष्ट केले. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे. गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करा. नाहीतर परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी दिला. दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई-मेल करा. मला अटक केली, तर आंदोलन करा, पण शांततेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!