ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांनी आता येत्या ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.

“शेतकरी विरोधी कायदे ५ डिसेंबरपूर्वी रद्द करा नाहीतर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा इशारा आम्ही सरकारला दिला होता. पण अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाहीय. त्यामुळे आता आम्ही ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत आहोत”, असं हरविंदरसिंग लखोवाल म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!