---Advertisement---

सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह; तर तिघांचा मृत्यू

On: December 4, 2020 5:49 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.  तर आजच 38 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  दिवसभरात  ३ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.  नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम होणार नाही, असा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. आतापर्यंत शहरात एकूण  दहा हजार 590 कोरोना रुग्ण आढळून आले आहे. शहरात आता  398 रुग्ण उपचार घेत आहे.

याठिकाणी नवे रुग्ण आले आढळले

शहरात आज राजस्व नगर (विजयपूर रोड), बिलाल नगर (जुळे सोलापूर), पद्मश्री अपार्टमेंट, अवंती नगर (मुरारजी पेठ), विडी घरकूल, आयडीलएल शाळेजवळ (सबर नगर), चाटी गल्ली, जानकी नगर, बालाजी अपार्टमेंट (अशोक चौक), नरेंद्र नगर (सैफूल), चांदणी चौक (फॉरेस्ट), सहारा नगर, मडकी वस्ती (गणेश नगर), श्रध्दा एलिगन्स (बाळे), शिरालिंग नगर (विडी घरकूल) आणि दोंदे नगर (जुळे सोलापूर) याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.

 

दुसरीकडे आज विष्णू मिल चाळ परिसरातील 68 वर्षीय पुरुषाचा, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर) येथील 64 वर्षीय महिला आणि दाजी पेठेतील मंजुनाथ नगर येथील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!