मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज दि.४ रोजी पुन्हा एकदा एसीबी चौकशी होणार आहे. राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. जानेवारी 2024 मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. हायकोर्टाला अंतरिम दिलासा देताना दिलेल्या निर्देशानुसार, आज साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहतील.
आज राजन साळवी यांचे कुटुंबीय दुपारी एक वाजता रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी हजेरी लावणार आहेत. मुंबई हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार आहेत. दरम्यान, राजन साळवी यांची पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी झाली.