ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभिनेत्री जयाप्रदा यांची जामिनावर सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या सुमारे पाच वर्षे जुन्या प्रकरणात रामपूरच्या विशेष न्यायालयाने अलीकडेच ‘फरार’ घोषित केलेल्या अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा अखेर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले; परंतु आजारपणाची याचिका मान्य करून प्रत्येकी २०,००० रुपयांच्या दोन जामिनावर जामीन मंजूर केला.

गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी रामपूरच्या विशेष एमपी / एमएलए न्यायालयाने जयाप्रदा यांना निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या दोन प्रकरणांमध्ये सतत गैरहजर राहिल्यामुळे ‘फरार’ घोषित केले आणि पोलिसांनी त्यांना अटक करून ६ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ अभियोक्ता अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी सांगितले की, जयाप्रदा सोमवारी नियोजित तारखेपूर्वीच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शोभित बन्सल यांच्या न्यायालयात अत्यंत गुप्तपणे आपल्या वकिलांसह हजर झाल्या. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने माजी खासदाराला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, परिणामी त्यांना काही काळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले. मात्र नंतर न्यायाधीशांनी जयाप्रदा यांची तब्येत ठीक नसल्याची विनंती मान्य करत न्यायालयाने त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या दोन जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला. यादरम्यान जयाप्रदा यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, आता त्या प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात हजर राहतील आणि हजर राहण्यापासून सूट मिळण्यासाठी कोणताही अर्ज दाखल केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!