नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी काळात देशातील लोकसभा निवडणूक येत आहे. त्यापूर्वी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”
यापूर्वी रक्षाबंधनानिमित्त सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील 33 कोटी ग्राहकांना होणार आहे.