ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उन्हाळ्यात चेहरा सुंदर ठेवण्यासाठी घरीच बनवा चेहऱ्यासाठी स्क्रब

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरूम म्हणजेच ब्लॅकहेड्स काढण्यासाठी महिला कित्येक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या या ब्लॅकहेड्समुळे प्रत्येक महिला त्रस्त राहत असून ते दूर करण्यासाठी महागडे क्रिम्स लावून ते घालवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, नारळ, गाजर यांचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी स्क्रब बनवू शकता. परंतु, हे स्क्रब कसे बनवायचे ते जाणून घ्या…

१. गाजराचा स्क्रब:
तुमची त्वचा जर निस्तेज झाली असेल आणि त्यावर तुम्हाला तेज आणायचे असेल तर तुम्ही घरी बसल्याच गाजरापासून चेमिकॅल मुक्त स्क्रब बनवू शकता. यासाठी अगोदर गाजर किसून घ्या. त्यामध्ये दही, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि मग चेहरा धुवून घ्या. या स्क्रबचा आठवड्यातून दोनदा वापर केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरावर अधिक उजळ येईल.

२. नारळाचा स्क्रब:
नारळ खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहितीच आहेत. परंतु, नारळ हे आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता वाढवण्यास देखील उपयोगी ठरते, हे मात्र कोणाला ज्ञात नसेल. नारळापासून स्क्रब बनविल्यास ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. अगोदर नारळ किसून घ्या. त्यात एक चमचा हळद आणि चंदन तेलाचे १५ थेंब घाला. हे मिश्रण एकत्र करा. त्याची पेस्ट करुन त्याने चेहऱ्यावर स्क्रब करा आणि नंतर चेहरा घुवून घ्या. या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवर वेगळाच ग्लो येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!