मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन महायुतीत संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याला विरोध केला होता. तसेच अकलूजचे विजयसिंह मोहित पाटील यांनीही नाराजी दर्शवली होती.
माढ्याच्या उमेदवारीवरुन महायुतीत सुरू असलेला संघर्ष मिटल्याची माहिती मिळत आहे. आज रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक पाऊल मागे घेत वाद मिटल्याचे संकेत दिले आहेत.
याच पाश्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मोहित पाटील यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांची बैठकही झाली होती. या बैठकीत धैर्यशील मोहिते पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. अखेर या नाराजीबाबत मुंबईमध्ये आज महत्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर या बैठकीला होते. यामध्ये रामराजे यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.