पुणे,दि.६ : लॉकडाउन नंतर सरकारने काही बंधने घालून सिनेमा गृह आणि नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिली आहे.
त्यानंतर सिनेमागृह काही प्रमाणात उघडली परंतु प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
आता त्यानंतर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्यास सुरुवात झाली नाट्यनिर्माते संघ यांच्यावतीने निर्णय घेऊन नाटकाचे प्रयोग सुरू करण्यात येत आहेत.
त्यात नाटकाचे पहिले तीन प्रयोग पुणे येथील यशवंतराव नाट्यगृह, बालगंधर्व, आणि रामकृष्ण नाट्यगृह चिंचवड या ठिकाणी
प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे गाजलेले नाटक एका लग्नाची दुसरी गोष्ट हे ते 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर ह्या दोन दिवशी तीन प्रयोग सादर होणार आहेत.
या नाटकाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड यांच्या हस्ते पुणे येथील तीन ही नाट्यगृह वर करण्यात आला.
या तीनही नाट्यगृहांमध्ये रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.
दहा मार्च रोजी पुणे येथे ह्या या नाटकाचा लॉकडाउन पूर्वीचा शेवटचा प्रयोग सादर झाला होता.
आज नऊ महिन्याने पुन्हा हा नाटकाचा प्रयोग सादर करणार असल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.
50% प्रेक्षक सामावून घेण्याच्या या अटीवर हे नाट्यप्रयोग सादर करणार आहोत आणि हे तिन्ही प्रयोग पहिल्याच दिवशी हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत असेही अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज कलावंत आणि आणि इतरही काही कलावंत यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली होती. कलावंतांची आणि रसिकांची ची जाण असलेला कलावंत म्हणून प्रशांत दामले यांची ची ओळख आहे.
पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे हे तिकीट विक्री शुभारंभ प्रसंगी नाट्यपरिषदेचे सुनील महाजन,नाट्य व्यवस्थापन संघाचे समीर हंपी, प्रवीण बर्वे, सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि अनेक रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत झाला लवकरच सोलापूरचे थेटर चालू करा आम्ही आमच्या नाटकाचे प्रयोग सोलापूर येथे ते करण्यास उत्सुक असल्याचे अभिनेते प्रशांत दामले आणि आणि अभिनेत्री कविता लाड यांनी सांगितले. सोलापूरच्या महापौर आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या दोघांनाही नाट्य निर्माते संघ यांच्यावतीने थेटर चे भाडे कमी करणे थेटर ची स्वच्छता करून पुन्हा थेटर अद्यावत करून सुरू करणे यासंदर्भात लवकरच पत्रव्यवहार करून असेही प्रशांत दामले यांनी सांगितले पुणे येथील सर्व नाट्यगृहांची पाहणीही यावेळी त्यांनी केली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.