---Advertisement---

सोलापूरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि ६ : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील पूर्णकृती पुतळ्यास व मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार येथे महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी.शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, उपायुक्त धनराज पांडे नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव,नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका ज्योती बमंगोडे, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, जयप्रकाश अमनगी,शेखर सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!