बोरामणीत गोरज मुर्हूतावर बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’
पंचायत समिती सदस्य आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
सनई-चौघडयांच्या ‘मंगल’सुरात, हजारो व-हाडीमंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी(ता.द.सोलापूर)येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांच्या गोरज मुर्हूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत दहा जोडप्यांच्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’ बांधण्यात आल्या.यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधू-वरांस शुभाशिर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बोरामणी येथे दरवर्षी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्यावतीने सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात येते.यंदा या सोहळयांचे बारावे वर्ष होते.सकाळी अकरा पासूनच नव वधू-वरांचे व पाहुणे मंडळीचे बोरामणीत आगमन होत होते.यावेळी आलेल्या व-हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था सकाळपासूनच करण्यात आली होती.यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रसह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी सह दोa aन्ही वधू-वरांस हळदीचे कपडे व संसारपयोगी भांडी देण्यात आले.यावेळी वधू-वरांचे गावातून बग्गीतून सवाद्य मिरवणूक काढणयात आली.त्यानंतर सांयकाळी मोकळया आकाशाच्या मंडपाखाली,विद्युत रोषनाईच्या झगमगाटात तसेच विविध धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे,माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, युवा नेते सुदीप चाकोते, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,युवा नेत्या शीतल म्हेत्रे,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे व अशोक देवकते,शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अमर पाटील, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख( ठाकरे गट) प्रिया बसवंती, सरपंच गायकवाड,नागराज पाटील,विजय राठोड, दशरथ कसबे,राजन जाधव, नागेश गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, श्रीदेवी फुलारे,ग्रामस्थ व जिवलग मित्र परिवार आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत व सत्कार या विवाह सोहळयांचे संयोजक धनेश आचलारे यांनी करून या जोडप्यांना पहिली मुलगी झाल्यास आचलारे मित्र परिवारांकडून मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या नावाने अकरा हजार ठेव ठेवण्यात येईल असे सांगितले. सूत्र संचालन मंगेश लामखाने यांनी केले तर आभार अप्पासाहेब हलसगे यांनी मानले. विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी धनेश आचलारे मित्र परिवारने परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने समाजात अशा सामुदायिक विवाह सोहळ्याची आहे. धनेश आचलारे मित्रपरिवाराने हा विवाह सोहळा आयोजित करून समाजऋण फेडण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले.
प्रेरणादायी उपक्रम..
समाजात अलीकडच्या काळात नेहमी दुष्काळी परिस्थिती असते.त्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची समाजाला गरज आहे.ती गरज धनेश आचलारे मित्र परिवारांतर्फे पूर्ण होत आहे.त्यांच्या पाठिशी आपण यापुढील काळात ही कायम राहू.अशी ग्वाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी येथे बोलताना दिले.