मैंदर्गी : वृत्तसंस्था
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ओलंपियाड मुव्हमेंट परीक्षेत श्री शिवचलेश्वर प्रशालेचे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व श्री शिवचलेश्वर संगणक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ओलंपियाड मुव्हमेंट (MOM) परीक्षेत श्री शिवचलेश्वर प्रशालेतीलसातवीतील श्रावणी नागुर हिने द्वीत्तीय सलेहाफातिमा बांगी तृतीय तसेच पाचवी मधील श्रेयस मडडे जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने यश पटकावले. शालेय अभ्यासक्रम आधारित संगणकावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेत 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये प्रशालेतील श्वेता हसरमनी अभिषेक अंबलगी कोमल गोब्बुर अक्षरा देगाव धानेश्वरी सलगर विक्रांत जुजगार आकांक्षा आळगी ज्योती गोब्बुर दीपक गोब्बुर मोनिका दुमगुणे कावेरी सवळी विनायक भुरकी यशस्वी विद्यार्थ्यांचा वीरशैव लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष काशिनाथ दिवटे, संस्थेचे उपाध्यक्ष तुकप्पा नागुर यांच्या हस्ते विज्ञान किट व शालेय साहित्य ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे
यावेळी प्राचार्य आनंद हरवाळकर परिवेक्षक आर डी जाधव राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील सोलापूर जिल्हा केंद्र समन्वयक रोहित जेऊरकर व केंद्र समन्वयक हारूण शेख यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे केंद्र संचालक औदुंबर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून MKCL ने आयटी जिनियस आणि शालेय स्तरीय अभ्यासक्रम आधारित विद्यार्थांना विविध स्पर्धा तसेच महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या टेस्ट घेण्यात येत असून या स्पर्धेसाठी भाग घेऊन लाभ घ्यावा असे आव्हान केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस येणेगुर यांनी केले