नवी दिल्ली । गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पेट्रोल-डीझेल भाव वाढीला आज ब्रेक लागला आहे. सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपयांच्या वर गेली आहे.
सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली. रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका आणि इतर काही देशांच्या अंतर्गत अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे.
आजच्या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 83.71 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, डिझेलची किंमत वाढवून 73.83 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइट अपडेट माहितीनुसार मुंबईकरांना आज प्रतिलिटर 90.34 रुपयांवर पेट्रोल खरेदी करावे लागेल. येथे डिझेलची नवीन किंमत 80.51 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे.
आज कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीबद्दल बोलतांना, आजच्या वाढीनंतर ते अनुक्रमे 85.19 रुपये आणि 86.51 रुपये प्रति लीटर केले गेले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही महानगरांमध्ये डिझेलची किंमत 77.44 रुपये आणि 79.21 रुपये प्रतिलिटर झाली आहे.