---Advertisement---

रोहित पवारांचा लोकलने प्रवास ; जागवल्या जुन्या आठवणी

On: December 8, 2020 1:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुंबईलोकलने प्रवास केला आहे. यावेळी रोहित पवारांसोबत कोणीही कार्यकर्ता किंवा समर्थक नव्हते. दरम्यान, रोहित पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड पर्यंत लोकलने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. लोकलप्रवासंबंधी अनुभव शेअर करताना रोहित पवारांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील लोकल प्रवासाच्या आठवणी जागवल्या.


 

मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या लोकल प्रवासाचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

 

विशेष म्हणजे यापूर्वीही रोहित पवार यांनी मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी, मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!