महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये व नवीन आयोग करणार : राहुल गांधी
मोदी ,आरएसएस आणि भाजपपासून संविधानाला धोका !
सोलापूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे.त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी बुधवारी सोलापुरातील मरीआई चौकातील महापालिकेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले,संविधान हे गरीब आणि दिन दलितांसाठी मोठे हत्यार आहे, हे हत्यार उध्वस्त करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला.
देशात २२ लोकांकडे ७० कोटी धन आहे. २२ लोकांसाठी नोटबंदी, किसान सन्मान योजना केली.
देशातील गरीब आणि शेतकऱ्यांचे एक रूपये कमी केले नाहीत.
मोदींनी गरिबांचा एकही रुपया कमी केलेला नाही.
काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे.इंडिया आघाडी सरकार आल्यावर गरीब कुटुंबांची यादी बनवून आणि दरवर्षी गरिबाच्या बँक खात्यावर एक लाख रुपये टाकणार आहे.
मोदींनी अनेकांना करोडपती बनवले आम्ही लखपती बनवणार आहोत. मोदींनी फक्त देशातील २२ करोडपतींना मदत केली आणि गरिबांना वाऱ्यावर सोडले आहे.मोदींनी गरिबाचे कर्ज माफ केलं नाही,असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
देशातील युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आणि त्रास दिला आहे.४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे.आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार केले जाईल, असे आश्वासन गांधी यांनी यावेळी दिले.
नोटबंदी आणि बेरोजगारीमुळे देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंमत चुकवावी लागेल.
श्रीमंतांच्या मुलांना देशातील सर्वात महागडी सुविधा मिळते तीच सुविधा गरीबातील कुटुंबातील मुलांना देणार आहोत .हा नवीन कायदा आम्ही आणणार आहोत.
पब्लिक सेक्टर ,प्रायव्हेट सेक्टर, सरकारी कार्यालयात एक वर्ष अप्रेंटीशीप नोकरीची एनडीए गॅरंटी देणार आहे.
लोकांना केवळ प्रशिक्षण आणि नोकरी देणार नाही तर दरवर्षी अकाउंटवर एक लाख रुपये देणार आहोत.
महिला ,बेरोजगार आणि देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी एक लाख रुपये टाकणार आहोत, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाहीत ,मात्र एनडीए सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार आहे.
धन दांडग्यांची कर्जे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करतात तर शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे.शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करणार, नवा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार ,कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग अहवाल देणार ,आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
देशातील कोणत्याही कंपनीमध्ये दलित ,आदिवासी आणि गरीब नाही. तरीसुद्धा कोट्यावधीची कर्जे यांना माफ केली जातात.त्यामुळे मोदी सरकार गरिबांचे नाही तर अदानी व अंबानी यांच्यासाठी सत्तेवर आले आहे, त्यांना या निवडणुकीतून हद्दपार केले पाहिजे, तरच देश सुरक्षित राहील आणि गरिबी हटण्यासाठी मदत होईल, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे च्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.