ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधानांपेक्षा जरांगे मोठे नेते नाहीत ; छगन भुजबळ यांचा टोला

नाशिक : वृत्तसंस्था

मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे मोदींपेक्षा मोठे नेते नाहीत, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले.

भुजबळ म्हणाले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही, हे जरांगे यांना माहीत नाही. आता आम्ही येवल्यात लढतो, तेथून निवडून येतो. ज्यांना एवढेही समजत नाही, त्यांना आपण काय सांगणार? यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभा होत आहेत. जरांगे सध्या गिणतीमध्ये नाहीत, अशी टीका भुजबळ यांनी केली.

मी घाबरत नाही : प्रकाश शेंडगे यांच्या वाहनावरील हल्ला निंदनीय आहे. हल्ला करून भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक वेळा माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी कोणाला घाबरत नाही. घाबरून निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. मी ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरेल. नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याने आपण माघार घेतली, असाही दावाही छगन भुजबळ यांनी केला.

दादागिरीने थांबवू शकत नाही: कुठल्याही पक्षाचा नेता असेल. कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मते द्यायची, किती विरोध करायचा. आपण लोकशाहीत दादागिरीने कुणाला थांबवू शकत नाही. म्हणून प्रकाश शेंडगे यांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे काम आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!