सातारा : वृत्तसंस्था
सातारा जिल्ह्यातला काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंबेडकर यांनी प्रत्यक्ष नाव घेतले तरी त्यांचा निशाण्यावर पृथ्वीराज चव्हाणच असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचा एक बडा नेता येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करेल कारण त्या नेत्याला भाजपात जाऊन राज्यपाल व्हायचे आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेले डॉ.आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबेडकरांच्या या विधानानंतर आता सातारा जिल्ह्यातला काँग्रेसच्या नेत्याबाबत चर्चा रंगली आहे.
डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सँडविच झालेल्या काँग्रेसला सहकार्याचा हाथ देवू अशी भूमिका मांडली. तर दूसरीकडे याच पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवबद्दल दुःख व्यक्त केले. यावरून दोन्ही पक्षातील छुपा समझोता उघड झाला असून राज्यात काँग्रेस का लढू शकत नाही, याची कारणेही समोर येऊ लागली आहेत. दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष होत असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले.