मुंबई : वृत्तसंस्था
एअर इंडिया एक्सप्रेसने आपली ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा समूहाच्या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचा समावेश असून उड्डाणे रद्द होण्याचे कारण सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनच्या वरिष्ठ क्रू मेंबर्सनी एकाचवेळी आजारी असल्याची रजा दिली आहे. त्यामुळे एअरलाईनला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. क्रू मेंबर्स अचानक रजेवर गेल्याने वादाचे संकेत मिळत आहेत. हे प्रकरण नागरी विमान वाहतूक विभागापर्यंत पोहोचले असून अधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत.