---Advertisement---

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ; ईडीला कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश

On: December 9, 2020 12:42 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा दिला आहे.   ईडीला कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी काल (8 डिसेंबर) सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर आज सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना सिद्धिविनायक गणपती पावला! असे बोललं जातं आहे.

यापूर्वी, ईडीने मंगळवारी (24 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने ८ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!