ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले. पंढरपुरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. आता परिस्थिती पूर्वरत होतेय, पण पावसाचा अंदाज आहे.

राज्यात मान्सून दाखल झालाय. कोकण आणि सोलापूरमध्ये मान्सून धडकलाय. आता पुढील चार दिवसांत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

रोहिणी नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे. जिल्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळांत 5 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन-चार मंडळ वगळता इतर मंडळांत पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 30.7 मि.मी. पाऊस पडला असून जवळपास ३० टक्के इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात मान्सूनच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले. विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली. मलिकपेठ,हिंगणी, बोपले या भागातील कोरड्याठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहत होते. दुष्काळसदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला मिळाला दिलासा मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!