मुंबई : वृत्तसंस्था
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वच विरोधकांनी टीका टिपण्णी सुरु केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची मालमत्ता सोडवली म्हणून अजित पवार गटाला मंत्रिपद मिळाले नाही असा टोला देखील त्यांनी लगाविला आहे. तसेच हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचं सरकार नाही. तर एनडीएचे सरकार आहे असेही राऊत म्हणालेत.
संजय राऊत म्हणाले, ”काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचे सरकार नाही. मोदींचे सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, सबकूछ मोदी असे काल चित्र नव्हते. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवले आहे. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या टिपूंचा इतिहास सर्वांना माहित आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पीयुष गोयल मंत्री झाले. ते स्टॉक एक्स्जेंच वाल्यांचे मंत्री आहेत”, असे राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले, ”अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्षाकडे आश्रयाला आहेत. त्यांना स्वाभिमान असता तर राज्यमंत्रीपद धुडकावले असते. नकली सेनेला एक राज्यमंत्रीपद फेकलं आहे. हे दोन्ही गट भाजपचे आश्रित आहेत. हे कॅबिनेट मंत्रीपदही किती दिवस टिकेल माहित नाही. काल ते शपथ घेत असताना काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला होत होता. तुम्हाला काश्मिर, जम्मू काश्मिरची चिंता नाही. फक्त सरकार चालवायचे आहे”, असे राऊत म्हणाले.