ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अयोध्येतील राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव असून त्यांचे वय 25 वर्षे आहे. ते आंबेडकर नगर येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज आला. सहकारी सुरक्षा कर्मचारी धावत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जवानाला गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. जवानाच्या मृत्यूने मंदिर परिसरात खळबळ उडाली. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची चौकशी केली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपास केला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या किंवा अपघात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच कारण स्पष्ट होईल.

शत्रुघ्न विश्वकर्मा 2019 च्या बॅचचे होते. ते आंबेडकर नगर येथील सन्मानपूर पोलीस ठाण्याच्या काजपुरा गावचे रहिवासे होते. SSF मध्ये तैनात होते. मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफ दलाची स्थापना करण्यात आली आहे. सहकाऱ्यांनी सांगितले की, घटनेपूर्वी शत्रुघ्न मोबाईलकडे पाहत होता. काही दिवसांपासून तो त्रस्त होता. पोलिसांनी जवानाच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!