ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानपरिषदेसाठी भाजपची ‘या’ उमेदवारांना राहणार पसंती

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात लोकसभा निवडणुक संपली असतांना आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे.

पंकजा मुंडे, अमित गोरखे,परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे , चित्रा वाघ, माधवी नाईक,
जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!