ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मेलो तरी बेहत्तर,सरकारला मॅनेज होणार नाही , जरांगे पाटलांचा विश्वास

लातूर : वृत्तसंस्था

मराठा समाजाच्या महाराष्ट्रात ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येकाचे तीन सगेसोयरे धरले तर दीड कोटी मराठ्यांना आताच ओबीसीतून आरक्षण लागू होते. हे सत्ताधाऱ्यांचे मूळ दुखणे आहे. यामुळे मराठा समाजाविरोधात वातावरण पेटवण्यात येत आहे. परंतु मराठा लोकशाही मागनि आंदोलन करून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. या लढ्यात मेलो तरी बेहत्तर, पण सरकारला मॅनेज होणार नाही, असा विश्वास देत मराठ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी २८८ उमेदवार स्वतंत्र उभे करायचे की ठरवून पाडायचे, याचा निर्णय लवकरच घेऊ, असे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरागे-पाटील यांनी सरकारला ठणकावले आहे. दरम्यान, देशातल्या एकाही राज्यात ओबीसीची कागदोपत्री नोंद नाही, असे सांगत जररांगे-पाटील यांनी लातूर येथे मंगळवारी आयोजित मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत बोलताना मंडल आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जरांगे-पाटील पुढे म्हणाले, सरकार आणि विरोधी पक्षही माझ्या आंदोलनाच्या मुळावर उठला असून, कोणत्या पक्षात आहोत, हे विसरून ओबीसी नेत्यांप्रमाणे प्रत्येक मराठा नेत्याने समाजाच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. पूर्वी शेती करणारा प्रत्येक जण कणबी होता परंत त्यामध्ये कायदे बदलून अटी घालण्यात आल्या आहेत. यामुळे शेती करणाऱ्या प्रत्येक मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्यावे, मी आरक्षणातला बाप आहे, अंतरवाली सराटीत भेट दिलेल्या शिष्टमंडळातील कायदेतज्ज्ञांसमोर झालेल्या चर्चेतील करारांप्रमाणे सगेसोयरेंची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा पुन्हा मुंबईला यावे लागेल आणि आलोच तर आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!