ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दातांवरील पिवळेपणा मूळापासून होणार दूर

दातांवरील पिवळेपणा वेगवेगळ्या कारणांनी वाढतो. खासकरून सिगारेट किंवा विडी ओढल्याने दातांवर एक पिवळा थर जमा होतो. तसेच तंबाखू खाल्ल्यानेही दात पिवळे होतात. दातांवर जो पिवळा थर जमा होतो त्याला मेडिकल भाषेत प्लाक म्हणतात. हा प्लाक म्हणजे एकप्रकारचा बॅक्टेरिया आहे. जो दातांमध्ये अडकलेल्या अन्नामुळे आणि लाळेमुळे तयार होतो.

प्लाक तसा नुकसानकारक नसतो, पण हा जर दातांवर जास्त दिवस राहिला तर दात कमजोर होतात. हिरड्यांचं नुकसान होतं. प्लाक जास्त जमा झाल्याने पायरिया, तोंडाचा वास, दातांना किड लागणे, हिरड्या कमजोर होणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या होतात. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक डॉक्टर जोसेफ मर्कोला यांनी दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे.

सामान्यपणे सगळेच लोक रोज सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी पेस्टचा वापर करतात. पण या पेस्टमध्ये वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे दात योग्यपणे स्वच्छ होत नाहीत. उलट दातांचं नुकसान जास्त होतं. जर तुम्हाला दातांचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर घरीच एक चांगलं पावडर तयार करू शकता.

पेस्ट बनवण्यासाठी काय लागेल ?

खोबऱ्याचं तेल
बेकिंग सोडा
चिमुटभर हिमालयन मीठ
पेपरमिनट ऑईलचे काही थेंब

कसं बनवाल पेस्ट?
खोबऱ्याचं तेल, बेकिंग सोडा, मीठ आणि पेपरमेंट ऑइल एका वाटीत घ्या. हे चांगलं मिक्स करा. सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी हे मिश्रण दातांवर चांगलं घासा. काही दिवस हा उपाय केल्यावर तुमचे दात चमकदार दिसतील.

प्लाक दूर कऱण्याचे इतर उपाय

– फ्लोराइड टूथपेस्टने दिवसातून दोन वेळा दात ब्रश करा. याने प्लाक आणि दातांमध्ये अडकलेले अन्न कण निघून जातील.
– रोज दातांची फ्लॉसिंग केल्याने म्हणजे दातांमध्ये अडकलेले कण काढल्याने दात स्वच्छ राहतात. दातांवर पिवळा थर जमा होत नाही.
– गोड आणि स्टार्च असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा. कारण यामुळे तोंडात बॅक्टेरिया आणि प्लाक तयार होतो.
– जेवण केल्यावर किंवा काहीही खाल्ल्यावर गुरळा करा. चहा, कॉफी, विडी किंवा तंबाखूचं सेवन कमी करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!