ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गायक राजेश कृष्णन यांच्या भावगीतांवर श्रोते भारावले

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री गणेश वंदना..!, केळीसदे कल्लू कल्लीनल्ली…!, कन्नड रोमांचन कन्नड..!, ई भूमी बण्णद बुगुरी..!, नुरू जन्मक्कू..!, अशा एक ना अनेक कन्नड भावगीते व भक्तीगीत, चित्रपट गीतांनी ख्यातनाम गायक राजेश कृष्णन यांच्या ‘संगित संजे’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवार दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी व पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभाशिर्वादाने सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व प्रसिध्द निवेदिका अनुपम भट आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ ह्या कन्नड कार्यक्रमाने चौथे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी व विरक्त मठाचे मठाधिपती परम पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात डॉ. श्री व सौ शरणबसप्पा दामा, श्रीमती मल्लम्मा पसारे, उद्योजक बसवराज माशाळे, दत्तकुमार साखरे, अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत धनशेट्टी, कन्नड साहित्य परिषदचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, राजशेखर उमराणीकर, राजकुमार झिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी अन्नमंडळात आल्यानंतर स्वागत न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले. महास्वमिजींनी महाप्रसादालयाची पहाणी करून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी लोकप्रिय कन्नड भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन, महिला गायकी पृथ्वी भट, सहगायक संतोष देव, रविराज, नटराज शेट्टीकेरे व प्रसिध्द निवेदिका अनुपम भट आणि सहकारी बेंगळूर यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

मोठ्या बहिणीचे घर म्हणजे महाराष्ट्र, तर छोट्या बहिणीचा कार्यक्रम म्हणजे कर्नाटक :
आजचा दिवशी संपन्न होणाऱ्या कार्यक्रम महाराष्ट्रात होत असलेल्या कार्य कर्नाटक कार्यक्रम म्हणजे मोठ्या बहिणीच्या घरी छोट्या बहिणीचा कार्यक्रम आहे. मोठ्या बहिणीचे घर महाराष्ट्र, तर छोट्या बहिणीचा कार्यक्रम म्हणजे कर्नाटक. कर्नाटकाचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व सर्व संगीत कलाकारावर श्री स्वामी समर्थ कृपा आशीर्वाद सदैव राहील असे लिहून परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी आशीर्वचन दिले.

गुणीजन गौरव : यामध्ये विशेष गौरव पुरस्कार जेष्ठ ज्योतिष अभ्यासक पंचय्या स्वामी व सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक इरेश बागेवाडी, अक्कलकोट घडामोडीचे धोंडप्पा नंदे, उपशिक्षक गुरुय्या बसलिंगय्या सलगर यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

दि. १५ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान सादर होणार आहे.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, रुपाली रामदासी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, मनोज निकम, प्रा.शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, शीतल फुटाणे, राजु नवले, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, अँड.संतोष खोबरे, अविनाश मंगरुळे, प्रमोद लोकापुरे, कांत झिपरे, चेतन साखरे, सिद्धेश्वर मोरे, विठ्ठल तेली, सुरेश पाटील, सायबण्णा जाधव, बाळासाहेब घाटगे, प्रसाद हुल्ले, बसवराज क्यार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!