अक्कलकोट : प्रतिनिधी
ख्यातनाम हास्य कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप व सहकारी यांचा “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सामाजिक, राजकीय चालू घडामोडीवर विनोदातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच विविध गाण्याने रसिकातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, दि. १७ जुलै रोजी बुधवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप आणि सहकारी यांचा धमाल उडवणारा ह्या कार्यक्रमाने ७ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन : महेश गावसकर पुणे, मिलन कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन पाटील, दत्ताअण्णा सुरवसे सोलापूर, प्रथमेश म्हेत्रे, गिरीश कणेकर(उद्योजक,शुभम बिल्डर्स, सोलापूर ) अशपाक बळोरगी, संपतराव शिंदे करमाळा, नारायणराव जोशी सोलापूर, डॉ. यशवंतराव डावखर, संजीवकुमार, दिलीप भाऊ सिद्धे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगले, सागर पाटील वळसंग, संजय देशमुख, बसलिंगप्पा खेडगी, रईस टीनवाला, यशवंततात्या धोंगडे, महेश हिंडोळे, मोतीराम राठोड, आनंद तानवडे, शिवशरण जोजन, लाला राठोड, उत्तम गायकवाड, अविनाश मडीखांबे, सुनिल बंडगर, शिवराज स्वामी, डॉ.प्रदिप घिवारे, मुजावर हैद्रा, अनिल राठोड पुणे, विलास राठोड, मल्लिनाथ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, अनुयाताई फुगे, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, आरती पोतदार, कोमल क्षीरसागर व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, संदिप फुगे, सौरभ मोरे, शितल फुटाणे, संतोष भोसले, डॉ. आर.व्ही. पाटील, अमर पाटील, प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा.भीमराव साठे, आत्माराम घाडगे, महेश गोगी, अरविंद शिंदे, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे, राजाभाऊ निकम, मनोज निकम, सनी सोनटक्के, अप्पू कलबुर्गी, स्वामीराव सुरवसे, बाळासाहेब मोरे, सायबण्णा जाधव, वैभव नवले, ज्ञानेश्वर भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अप्पा हंचाटे, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, सौरभ मोरे, महादेव अनगले व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसाद हुल्ले, महादेव होळ्ळा, मामा जकापुरे, शैलेंद्र शिंगणे, शाहीद वळसंगकर, राजू एकबोटे, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, गणेश पाटील, प्रीतीश किलजे, सिध्दाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिकार्जुन कोगाणुरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.
विशेषगौरव पुरस्कार : निवेदिका श्रीमती श्वेताताई हुल्ले यांच्या सह गुणीजन गौरव : विठ्ठल रामराव मोरे, महमद इस्माईल बेसकर, डॉ.राहूल लिंबीतोटे, आतिश पवार, वैजिनाथ तालीकोटी यामध्ये यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
दि. १८ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘स्वर संध्या’ सादरकर्ते – महेश काळे आणि सहकारी, पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.