ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात पावसाचा जोर वाढला : दोन जण गेले वाहून ; एकाचा सापडला मृतदेह

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात पावसाचा हाहाकार सुरु असून सध्या मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्वच शाळा व महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात 2 व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. या दोन घटना वेगवेगळ्या गावात घडल्या असल्या तरी त्या एकाच नाल्यावर घडल्या आहेत हे विशेष. विलम गावात घडली. विलम येथील ॠणाल प्रमोद बावणे (11) हा मुलगा सकाळी 11.30 च्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्याला आलेला पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू होती. यामुळे या मुलानेही नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पण अर्ध्यात असताना अचानक त्याचा पाय घसला आणिा तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.

दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (30) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!