मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली. या घटनाक्रमानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना मिळणारा पाठिंबा आता कमी झाला आहे. ही बाब त्यांच्याही लक्षात आली आहे. त्यांचे नाटक लोकांच्या समोर येत आहे. भरकटलेले जरांगे आमच्यावर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाहक टीका करत आहेत. पण ते हे सर्व कुणाची सुपारी घेऊन करत आहेत हे जनतेला समजले आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर अक्षरशः एकेरी भाषेत हल्ला चढवला आहे. तू कुणालाही पाडण्याचा ठेक घेतला आहे का? हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे कर, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी जरांगेंना मराठा समाजातून मिळणारा पाठिंबा कमी झाल्याचा दावाही केला. लाड यांच्या टीकेमुळे जरांगे व भाजपतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रसाद लाड म्हणाले की, तु काय ठेका घेतला आहे का याला पाडणार त्याला निवडून आणायचे… एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावे निवडणूक लढवावी आणि आपले 288 उमेदवार उभे करावे असे आव्हान प्रसाद लाड यांनी दिले आहे. मराठा आंदोलनासाठी त्यांनी लढावे, त्यांच्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि राहिल असे प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना हे म्हटले आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, लोकांचे लक्ष विचलित करायचे म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. अटक वॉरंट हे न्यायालयातून निघत असते. त्यांचा मान सन्मान राखायला पाहिजे. 2013 मध्ये लोकांचे पैसे खाल्ले असेही लाड यांनी म्हटले आहे. प्रसाद लाड म्हणाले की, निजामाने मनोज जरांगे यांना काय सर्टीफीकेट दिले आहे का कोण मराठा आहे की नाही हे ठरवण्याचे. तर मनोज जरांगे पाटील दादा आता हे मोघलाई कडे निघाले आहेत. ते राजकारणात चाले हे आता स्पष्ट झाले आहे. मी जातीवंत मराठा आहे. माझ्या पणजोबाच्या नोंदी सापडल्या त्यामुळे आम्ही ओबीसी झालो. मनोज जरांगे यांचे पण सर्टीफीकेट सापडले. मग तुम्ही त्यांना विचारा ते मराठा आहेत की ओबीसी?, असे लाड यांनी म्हटले आहे.