गांधीनगर : जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे. कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
गांधीनगरच्या रुपल गावामध्ये ही दुर्देवी घटना घडली. कल्पनाबेन गाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
एका कौटुंबिक विवाह सोहळयात चिमुकलीला कडेवर घेऊन महिला गरबा खेळत होती. गरबा खेळत असताना अचानक महिलेला ह्दयविकाराचा झटका आला आणि तितक्यात खाली कोसळली.
लग्न सोहळ्यासाठी भरलेल्या घरात अचानक कोसळला दु:खाचा डोंगर, गरबा खेळताना महिलेचा हार्ट अॅटेकने मृत्यू, CCTV VIDEO pic.twitter.com/Aez7uXIvVI
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) December 12, 2020
त्यावेळी आजूबाजूला गरबा खेळणाऱ्या महिला तिच्या दिशेने धावत जातात. पण काही सेकंदात जागीच तिचा मृत्यू झाला. कल्पनाबेन गाडवीला ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. पण गरबा खेळताना तिला ते समजलं नाही आणि ती जमिनीवर कोसळली. हि दुर्दैवी घटना या व्हिडीओ फुटेजमध्ये दिसते. अवघ्या काही सेंकदांमध्ये महिलेचा मृत्यू झाला.