---Advertisement---

कोल्हापूर हादरले! विवाहित महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

On: December 12, 2020 1:14 PM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : कोल्हापूर सामुहिक बलात्काराने हादरला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडीत एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. संदेश ऊर्फ पुष्पक आदाम ढगे (वय १९) असे एका संशयिताचे नाव असून, दुसरा अल्पवयीन असून दोघेही रा. साखरवाडी कोडोली (ता. पन्हाळा) येथील आहेत. याप्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

ही विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. घरात कोणीही महिला नसल्याचं लक्षात आलं. पण तोच घरातील संशयित आरोपींनी तिचे हात खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. विवाहितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलगाही असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

 

या घटनेचा कोडोली पोलीस तपास करत असून पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचं सांगण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांची दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!