ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढत असतांना राज्यातील देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा यलो अलर्ट आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान 106 टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी (94 ते 106 टक्के) पावसाचा अंदाज आहे. थोडक्यात, उर्वरित हंगामाचा विचार करता ऑगस्ट महिन्यात कमी, तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!