ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तसे वचन विरोधकांनी जाहीरनाम्यात द्यावे ; माजी मंत्री दानवेंचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या माध्यमातून तापले असतांना आता भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट विरोधकांना धारेवर धरले आहे.

माजी मंत्री दानवे म्हणाले कि, आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसा आरक्षण देता आले तसे आम्ही दिले. त्याच्यावर मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नाहीये. त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागते तो मागण्याचा त्यांना अधिकार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान रावसाहेब दानवे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्यांना कोणाला जास्त मत पडले आणि ते निवडून आले त्यांनी काय कशा पद्धतीने मागण्या करतात फक्त एकच मागणी करावी. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने फक्त एकच मागणी करावी की, जरांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. तसे वचन विरोधकांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील 288 मतदारसंघात निवडणूक लढवणार असून ते उमेदवारांसाठी चाचपणी करत आहे, यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, मनोज जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत. त्यांना अधिकार आहे, असे कोण म्हणू शकतो, उमेदवार उभे करु नका. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!