नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोलकातामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज (दि.१७) देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात संपाची घोषणा केली आहे. या संपादरम्यान सर्व लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद राहणार आहे. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
कोलकातामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करत निर्घृण हत्या केली. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आज (दि.१७) देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. या संपादरम्यान सर्व लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद राहणार आहे. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
संप दरम्यान दिल्लीतील एम्स, आरएमएल, डीडीयू, एलएनजेपी, लेडी हार्डिंग, सफदरजंग यासह अनेक प्रमुख सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आज (दि.१७) आपली सेवा देऊ शकणार नाहीत. संपादरम्यान आज सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्व डॉक्टर्स संपावर राहणार आहेत. संपावर गेलेल्या डॉक्टरांची मागणी आहे की, केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी सेंट्रल प्रोटेक्शन एजन्सी (सीपीए) तयार करावी. त्याचबरोबर यासंदर्भात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती, मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने असोसिएशनने संप पुकारला आहे.
कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास पोलिसांनी घटनेच्या सहा तासांत एफआयआर दाखल करून कारवाई सुरू करावी, असे निर्देश केंद्र सरकारने शुक्रवारी (दि.१६) दिले होते. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने आज रोजी देशभरातील सर्व लहान-मोठी रुग्णालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या काळात डॉक्टर २४ तास संपावर राहणार असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.व्ही.अशोकन यांनी सांगितले. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील, मात्र ओपीडीसह इतर सेवा बंद राहतील.